दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक- ओंकार लव्हेकर
लोहा– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमलातांडा संकुल सुगाव येथे नुकतेच ऊस तोडणी व इतर कामासाठी स्थलांतर झालेल्या मजुरांच्या शाळेतील मुलांसाठी हंगामी अनिवासी वसतिगृहाचा उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सुगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक बी जी.कापसे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. एस.मंगनाळे, अखिल शिक्षक संघटना चे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक पतपेढी संचालक अशोक पाटील मारतळेकर , गट साधन केंद्राचे गट समन्वयक रामदास कस्तुरे, बाळू चव्हाण, एम. डी सिरसाट ,बालाजी ढाले ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाबराव जाधव , उपाध्यक्ष पंडित राठोड, ज्येष्ठ नागरिक शंकर राठोड, पोलीस पाटील शेषराव जाधव, वसंत जाधव,गोविंद महाराज, रघुनाथ पवार, नामदेव पवार,भीमराव पा. घोरबांड,कलीम शेख, माधव राठोड नारायण चव्हाण , बालाजी शिंदे आदी उपस्थित होते व प्रास्ताविक मुख्याध्यापक सय्यद इलियास यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर शितळे यांनी केले. आभार प्रदर्शन राहुल कुंडलवाडीकर यांनी केले .
