दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..तालुक्यातील केहाळ वडगाव येथील हनुमान मंदिरात साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, मंदिरांच्या रंगरंगोटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.गुरुवारी पहाटेच
हनुमंताच्या मूर्तीला पुष्पमाला, रुईच्या फुलांच्या हारांनी
सजविण्यात येणार आहे. पहाटे चार वाजता भजनाला सुरुवात होईल पाच वाजे नंतर अभिषेक करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम होईल व नंतर इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी दोन वाजता भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
