दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
दिनांक 02/04/2023 रोजी इंदिरा गांधी स्टेडियम मैदान, परभणी. येथे Y20 चौपाल कार्यक्रमाचे आयोजन रामदास पवार यांच्या वतीने करण्यात आले होते..
Y20 चौपाल हे Y20 आणि G20 बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि Y20 च्या मुद्द्यावरून तरुणांशी चर्चासत्र करून त्यांच्या विविध कल्पना मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आले होते..
यामध्ये 50 युवकांनी सहभाग नोंदवला या युवकांना “युवकांसाठी अजेंडा आरोग्य क्रीडा आणि कल्याण” या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ‘प्राध्यापक संतोष कोकिळे’ सर यांनी मार्गदर्शन केले.. प्राध्यापक कोकीळ सर यांनी मार्गदर्शन करताना नवतरुण युवकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच क्रीडा क्षेत्रात सहभाग नोंदवत असताना आपले आरोग्य त्याचबरोबर आपला मानसिक व शैक्षणिक विकास करून आपले कल्याण कसे करता येईल यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले..
या चर्चासत्रात बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्थानिक क्रीडा विषयी समस्या मांडल्या तसेच नाविन्यपूर्ण कल्पना सांगितल्या जसे की स्टेडियम मैदान टरफिकेट असेल सिंथेटिक रनिंग ट्रॅक असेल अशा बऱ्याच नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी सांगितल्या
Y20 चौपाल कार्यक्रमाच्या चर्चासत्रास रामदास पवार,सुरेश काकडे सर,माऊली कोपरे,शिव गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती..
#Y20India
देवेन्द्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
विक्रांत पाटील
Rahul लोणीकर परभणी शहर प्रतिनिधि. शेख इसाक
