दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे कामजळगा येथील दि ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल उमरदरी ता.मुखेड विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता बालाजी पाटील रा.मौजे कामजळगा ग्रामीण भागातील विद्यार्थिनी नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षांमध्ये सन 2023 ते 24 मधून निवड झालेली आहे त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शंकर नगर येथील नवोदय विद्यालयाच्या परीक्षा इयत्ता आठवीच्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षेमध्ये माधवराव पाटील कामजळगेकर यांची नात कुमारी प्राजक्ता बालाजी पाटील ही उत्तीर्ण झाली असून तिची निवड नवोदय विद्यालय येथे इयत्ता नववी साठी झालेली आहे त्याबद्दल ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व सहशिक्षक तसेच बालाजी माधवराव पाटील, आई, वडील, आजी, आजोबा व सर्व नातेवाईक व सामाजिक स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
