दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): धनगर समाजाच्या विविध समस्येसाठी समाजाने एकत्र येत रस्त्यावर उतरून समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केले पाहिजे तरच धनगर समाजाकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल असे प्रतिपादन राज्यसभा खा.पदमश्री डॉ.विकास महात्मे यांनी तिवसा येथे आयोजित धनगर समाज मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून आपले विचार व्यक्त केले यावेळी धनगर समाज विचार मंचावर दै.विदर्भ मतदार मालक तथा मुख्य संपादक अँड दिलीप एडतकर(अमरावती) निहारिकाताई खोंदले(मुंबई)अँड अनिरुद्ध येताळे(लातूर)
रामविजय बुरूंगले(शेगाव)डॉ. जयप्रकाश बनकर(अमरावती) विलासराव डाखोरे(अमरावती)प्रा.राजू गोरडे(वर्धा)बाळासाहेब कोराटे(अमरावती) बाळासाहेब अलोने, मुख्यआयोजक
शिवहरी बोकडे(करजगाव) रोषणीताई पूनसे(तिवसा) प्रेमाताई लव्हाळे(अमरावती)पद्माताई फुटाणे(अमरावती)ज्योतीताई अवघड (अमरावती)नंदाताई
चाफले(अमरावती)अण्णासाहेब उंदरे(तिवसा)ज्ञानेश्वरराव थोटे (सातरगाव)रामकृष्ण गावनेर (तिवसा)आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना खा.महात्मे म्हणाले की,आम्हाला कुणाचे आरक्षण घ्यायचे नाही यावर शासनाने योग्य तोडगा काढून मार्ग काढणे आवश्यक आहे यासाठी समाजाने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे त्याशिवाय सरकारचे लक्ष आमच्या समस्येकडे जाणार नाही शासनाने धनगर समाजाच्या विकासासाठी बजेटमध्ये १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे याबाबत समाजात प्रचार आणि प्रसार होऊन त्याचा योग्य फायदा समाजाने घेतला पाहिजे असे खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर धनगर समाजाचे मिळावे जागोजागी होणे आवश्यक आहे धनगर समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या किती आणि कसा आहे हा संशोधनाचा विषय आहे आरक्षण प्रश्नावर बोलताना अँड एडतकर म्हणाले की, आम्हाला कुणाच्या ताटातला घास नको आहे आम्हाला ३.५टक्के आरक्षण दिल्यास मूळ आदिवासी आणि आदिवासी एकत्र नांदतील निवडणुकीपर्यंत धनगर समाज एकत्र असतो आणि निवडणुकीत काँग्रेस,भाजपा,बसपा यात विखुरला जातो यासाठी प्रबोधनात्मक शिबिर झाले पाहिजे यासाठी राजकीय, सामाजिक दृष्ट्या एकत्र येऊन आपला राजकीय बुद्ध्यांक वाढवणे आवश्यक आहे असे ही भाषणाच्या सरते शेवटी दिलीप एडतकर यांनी स्पष्ट केले तर धनगर समाज मेळावाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना मुख्य आयोजक तथा शिक्षक शिवहरी बोकडे म्हणाले की,धनगर समाजाने पक्षीय राजकारण सोडून समाजाच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे त्यात सामाजिक विकासासाठी युवा पिढीने आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढून समाजाची सर्वांगीक प्रगती करणे आवश्यक आहे आणि आणि राजकीय प्रगतीसाठी समाजात एकजूट निर्माण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले मुख्य कार्यक्रमापूर्वी तिवसा शहरातून येळकोट येळकोट,जय मल्हार असा जय घोष करीत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर कार्यक्रम स्थळी बहुजन नायकांच्या प्रतिमेला अभिवादन करत मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमात धनगर समाजातील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी,व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रेमाताई लव्हाळे यांचा खा. विकास महात्मे व अँड दिलीप एडतकर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिक्षक शिवहरी बोकडे व शिक्षिका सौ.अर्चनाताई बोकडे यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संचालन वंदनाताई बरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश साव यांनी केले मेळाव्याला हजारोच्या संख्येत धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती
