दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- दि:- १४/०४/२०२३ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे किनगाव मोहगाव रोड येथे शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली अंदाजे ३०ते३५ वर्ष वयाच्या अनोकी व्यक्तीचा प्रीत डोक्याला जखम व बाजूला रक्ताने माखलेला दगड अढळून आला होता सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अनोळखी व्यक्तीचा अज्ञान आरोपीने अज्ञान कारणासाठी खून केला .वगैरे तक्रार वरून भादवी कलम३०२अन्यावे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर चा गुन्हा उघडकेस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुसंगाने सदर गुन्ह्याचा तपास भाऊसाहेब खंदारे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन किनगाव स्वतः करीत होते. तपासादरम्यान सदर गुण्यातील मयत अनोळखी व्यक्तीची ओळख निसपन्न करून गोपनीय बतमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीचे बारकाईने विसलेशन करून सदर चा गुन्हा *आरोपी तेजस शिरसाट रा.शिरसाटवाडी* यांने केल्याचे निसपन्न झाले.आरोपी तेजस शिरसाट यांचा पोलीस दिनांक १४/०४/२०२३ पासून शोध घेत होते.परंतु तो पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके तयार करून शोध घेण्यात येत होता.तो कोणत्याही नातेवाहिकांच्या किव्हा मित्राच्या संपर्कात नव्हता , त्यामुळे आरोपीचा शोध घेणे हे पोलिसासाठी जिकिरीचे व आव्हानात्मक काम होते सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला श्री निकेतन कदम सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग चाकूर चार्ज अहमदपूर व श्री अजय देवरे , अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः भेट देऊन तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी श्री सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते. सदर पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पुणे येथे जाऊन आरोपी विषयी सर्व प्रकारचे गोपनीय माहिती जमा केली होती. त्या माहितीच्या आधारे दिनांक २२/०४/२०२३ रोजी पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी तेजस शिरसाट याला चाकण परिसर पुणे येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केले .आरोपीने दारू पिताना झालेल्या किरकोळ शिवीगाळ वरून खून केल्याचे कबूल करून गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या कबुलीप्रमाणे पुरावे हस्तगत करायचे काम चालू आहेत .आरोपीला मा. न्यायालय समोर हजर केले असता मा.न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे .सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्यासाठी श्री भाऊसाहेब खंदारे, सहायक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकातून पोउपनी संदीप अन्य बोईनवाड,सह. पोउपनी श्री.गोखरे, पोलीस अंमलदार शिवाजी तोपरपे, नागनाथ कातळे, सुनिल श्रीरामे इत्यादींनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याच्या अतिशय कमी वेळात छडा लावून गुन्हेगारांला जेरबंद करण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
