गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा
नारायणा इंटरनॅशनल स्कुल लोहा येथे भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे १५ ऑगस्ट सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. नारायणा इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री नारायणराव मुंडे सर यावेळी उपस्थित होते.उपस्थितांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव केंद्रे सर,सचिव नामदेवराव केंद्रे सर,सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी,पालक तसेच परिसरातील काही विद्यार्थीचे पालक व नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक स्तरातील लहान चिमुकल्या मुला-मुलींनी आपापल्या पद्धतीने सुंदररित्या भाषणे केली तसेच प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी रितिका इंदुरकर व अक्षरा पवार यांनी केले. विद्यार्थांच्या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थांना स्वातंत्र्य दिनाबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले व तसेच शाळेपासून तहसील कार्यालय लोहा पर्यंत लेझिम पथक प्रभात फेरी काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले, अशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
