गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा
लोहा शहरात १५ ऑगस्ट आझादी का अमृत महोत्सवानिमित्त भाग्यवंती महिला अर्बन निधी लिमिटेड व गौरी गणपती सेवा संस्था व इनरव्हिल क्लब लोहा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मोफत आरोग्य शिबीरात डॉ विश्वजीत शिंदे , व कु ऋतुजा शिंदे यांनी मोफत रूग्णांची शुगर , बी पी , सह अन्य तपासण्या करण्यात आल्या यावेळी शहरी भागांसह ग्रामीण भागातील महिलांनी या कार्यक्रमाला सहभाग नोंदविला होता. व भाग्यवंती अर्बन निधीच्या वतीने अनेक वेळा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन भाग्यवंती महिला आर्बन निधीचे संचालक डॉ बगडे जि डी सौ शोभा बगडे , व श्रीमती सविता सातेगावे यांनी केले होते तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी बॅक कर्मचारी तेजस्वी इंगळे , साक्षी जोंधळे , गुलाब ठाकुर मंजुषा पोसपुटवार राणी धुत यांनी अधिक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
