दैनिक चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
(दि 30)परंडा येथे व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नावर चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने सरकारी दवाखान्यामधील असुविधा शासकीय कार्यालयामधील शेतकरी नागरिकांना उद्भवणारे विविध समस्या या विरुद्ध आवाज उठवून या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला . या बैठकीमध्ये 6 जानेवारी 2024 जागतिक पत्रकार दिन निमित्त पत्रकार दिन साजरा करण्याचे नियोजन सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात येणार आहे याचाही आढावा घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत , रतिलाल शहा यांची निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार बांधवांनी आपले मत व्यक्त केले व पत्रकारितेमधील अनुभव देखील सर्व सहकारी पत्रकार बांधवांना सांगितला अनमोल असे मार्गदर्शन अध्यक्ष यांनी केले पत्रकार बांधवांच्या हस्ते पवनराजे मल्टीस्टेट बँकेच्या दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले .यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद परंडा तालुका सचिव तानाजी घोडके सहसचिव रवींद्र तांबे मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे पत्रकार किरण डाके पत्रकार धनंजय गोफणे हनुमंत मस्तुद, बाबर मशायक, दत्ता नरुटे, संतोष शिंदे, फारूक शेख ,शिवाजी सूर्यवंशी, विजय मेहेर ,समीर ओव्हाळ, नाना केसकर ,अलीम शेख, साजिद शेख आधी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
