रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या वाणीतून कुरुळ्यात रामकथा होणार.
दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :– कंधार तालुक्यातील मौजे कुरूळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजी मंदिर येथे चतुर्थदश वर्धापन सोहळ्यानिमित्त ब्रह्मोत्सव व श्रीराम कथा वाचन,ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. याचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा.
कुरुळा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजी मंदिर येथे चतुर्दश वर्धापन सोहळा मिती मार्गशीर्ष कृष्णपक्ष ५ शके १९४५ दिनांक १ जानेवारी रोज सोमवार सुरुवात होत असून या सोहळ्याची दिनांक ७ जानेवारी २०२४ रोज रविवारी सांगता होणार आहे. रामकथेचे प्रवक्ते रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर हे राहणार आहेत. श्रीराम कथेची वेळ दुपारी दोन ते पाच पर्यंत असणार आहे.ब्रह्मोत्सव सोहळा हा दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारीला वेळ सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते सात या वेळेत होणार आहे. यासाठी पुरोहित म्हणून पंडित अर्जुन महाराज शास्त्री मध्यप्रदेश व पंडित घनश्याम पांडे मध्यप्रदेश यांच्या हस्ते होणार आहे. श्री भगवान बालाजी ची नगर प्रदर्शना दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत होणार आहे. मुख्य गायक व हार्मोनियम वादक म्हणून ह.भ.प. काशिनाथ महाराज पाटील जळगाव, तबला संगीत विशारद ह.भ.प. अश्विन कुमार मध्यप्रदेश, सहगायक ह.भ.प. निळोबा महाराज सूर्यवंशी हे राहणार आहेत.काल्याचे किर्तन वैराग्यमूर्ती नामदेव महाराज दापकेकर यांचे किर्तन दिनांक ८ जानेवारी रोज सोमवारी होणार आहे. काल्याचे किर्तन आरती आणि महाप्रसाद सकाळी दहा ते एक या वेळेत होणार आहे.
तरी कुरूळा व कुरूळा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री भगवान बालाजी मंदिर चतुर्दश वर्धापन सोहळ्यानिमित्त ब्रह्मोत्सव श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याला उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा.असे श्री भगवान बालाजी मंदिर विश्वस्त मंडळ व गावकरी मंडळी तसेच व्यापारी मंडळी यांनी सांगितले आहे.
