गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मुंडे व राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
सातत्याने राज्यासह देशातील पत्रकारांच्या अडीअडचणी, समस्या आणि विविध प्रश्न घेवून लढा देत असलेले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मुंडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने लोहा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे जिल्हा निवड समिती अध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांना तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बारी, डॉ. प्रशांत जाधव, शेळके, शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापक फसियोद्दीन शेख, शेटे, विषय तज्ञ बाळू चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील चव्हाण, पत्रकार प्रदीप कांबळे, अंबादास पवार, संग्राम चव्हाण, विशाल घंटे, तुळशीराम पाटील लुंगारे, मारोती कांबळे, विश्वनाथ शिंदे, सुनील पाटील पवार आदींसह बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.
