दैनिक चालू वार्ता
दौंड प्रतिनिधी प्रवीण पवार- 9923531092
दौंड. दि. १. सालाबाद प्रमाणे यावर्षीही २०६ वा शौर्यदिन बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभा यांच्या वतीने (वर्ष ७ वे) भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती उभारून ५०० महार शूरवीरांना मानवंदना देण्यात आली ३० फुट विजयस्तंभ उभारण्यासाठी भीमसैनिकांनी ५० किलो फुले आणि तब्बल ९ ते १० तास वेळ लागला हा स्तंभ उभारणीसाठी भीमसैनिकांनी खूप परिश्रम घेतले.
या कार्यात विशाल सोनवणे, (अध्यक्ष बसपा) तुषार सवाने, (उपाध्यक्ष बसपा) अमन खान,हर्षल पाटोळे, राहुल कांकाळे, वाहिद सय्यद, अभिजीत डेंगळे, अक्षय शिंदे, श्रीकांत माने, किरण जगताप, सकलेन खान, बबन थोरात, सुनील शिंदे, विनायक ननवरे, रवी वाल्मिकी, दत्ता तिगोटे, केतन बोरुडे, राजेंद्र आढाव, अरविंद पगारे, करण केदार, मंगेश सोनवणे या सर्व भीमसैनिकांनी आपले परिश्रम देऊन ३० फुट स्तंभ उभारला. या स्तंभाला भीमसैनिकाकडून मानवंदना देण्यात आली…
