दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :आठवडी बाजार नगरपरिषद मार्केट येथे संजीवनी ॲक्युप्रेशर फिजिओथेरपी सेंटरचा उद्घाटन सोहळा प.पू. वैरागी बाबा उर्फ विनयमुखी पंजाबी यांच्या हस्ते दि.१ जानेवारी रोजी संपन्न झाला.
सौ.अरुणाताई काळमेघ यांनी ॲक्युप्रेशर फिजिओथेरपी चा चार वर्षांचा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम केला असून त्यांना त्यामधील दांडगा अभ्यास आहे.या अभ्यासक्रमात मानवी शरीराशी संबंधित आजार आणि वेदनांवर बाह्य उपचार शिकवले जातात.यामध्ये कोणत्याही औषधाशिवाय व्यायामाद्वारे रुग्णाच्या आजारावर योग्य उपचार केले जातात असे यावेळी सौ.अरुणाताई यांनी म्हटले.त्यांच्या संजिवनी ॲक्युप्रेशर फिजिओथेरपी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले,किसान मोर्चा प्रदेश सदस्य गजानन काळमेघ,डॉ.विद्याताई देशमुख,डॉ.नालट मॅडम,तालुका महिला मोर्चा अध्यक्ष निताताई बोचरे,विक्रम पाठक,मनीष मेन,डॉ.श्रीनिवास मिसार,किरण गिऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते.
