दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :येवदा येथील जनतेला भेडसावणाऱ्या विविध नागरी, मूलभूत सेवा, सुविधा, समस्या सोडवणेबाबत अनेक वेळा येवदा ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, तसेच जिल्हा प्रशासन यांना वेळोवेळी निवेदने सादर करून सुद्धा नागरिकांच्या समस्यांचा निपटारा झाला नाही.या नागरिकांच्या समस्यांचा निपटारा दि.३१ डिसेंबर रोजी पर्यंत होणे अपेक्षित होते आणि तश्याप्रकारची मागणी सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे करण्यात आली होती.परंतु दि.१ जानेवारी पर्यंत प्रशासनाने येवदा येथील नागरिकांच्या समस्यांचा निपटारा न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर व कार्यकर्ते यांनी दर्यापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत येवदा येथील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत तोपर्यंत दर्यापूर येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्या दालनात मुक्काम आंदोलन करणार असल्याचे यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
