गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
पोलीसवाडी या गावांमधून माधव हुंगे यांनी त्यांचा ॲपे ऑटो दिवसभर चालवून रात्री अंदाजे आठ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर लावला होता. रात्री मधून सदरचा ऑटो चोराने चोरून नेला होता. याबाबत माधव होंगे यांनी पोलीस स्टेशनयेथे दि.1/1/2024 रोजी चोरी बाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
त्यावरून लोहा पोलीस स्टेशन यांनी नवीन वर्षातील पहिला गुन्हा गुर क्र 01/2024 भादवी कलम 379 प्रमाणे दाखल केला.
तात्काळ सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. एच.चोपवाड साहेब यांनी सुरु केला, संशयित आरोपी विष्णुकांत सुरेश लांडगे वय 22 वर्ष रा. बनवस ता. पालम जी. परभणी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली त्यांना संशय आल्यावरून त्यांनी तात्काळ आरोपीच्या गावी बनवस येथे जाऊन आरोपीच्या गावामध्ये शोध घेतला आरोपीने ऑटो चोरी करून गावात नेऊन लपवून ठेवला होता याचा शोध घेऊन बनवस येथून सदरचा ऑटो पोलिसांनी जप्त केला.
आरोपीय यास अटक करून आज रोजी न्यायालयामध्ये सादर केले. न्यायालयाने सदर आरोपीला दोन दिवसाचा पीसीआर दिला आहे. सदर आरोपीने इतर अजून कोणत्या चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चोपवाड साहेब,मेजर राजेंद्र केंद्रे,वामन राठोड,चालक गिते,यांनी केली…
