गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड :- लोहा मीमांसा फाऊंडेशन, दै. समीक्षा, मिडीया पोलीस सोशल क्लब व मंथन क्रिएटीव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त आपल्या लेखणीतून वंचित घटकांना न्याय मिळवून देणारा पत्रकार क्षेत्रातील निर्भीड पत्रकार पुरस्कार लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद कदम यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे वितरण पाच जानेवारी मिनी सह्याद्री हॉल शासकीय विश्रामगृह नांदेड येथे दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक, पुरस्काराचे संयोजक रुपेश पाडमुख ,रामेश्वर धुमाळ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आसुन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गोविंद कदम यांना जाहीर झाल्याबद्दल नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार शामसुंदर शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार, माजी शिक्षण सभापती संजय पाटील क-हाळे काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पवार यांच्यासह आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
