दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :-नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते,उद्योगरत्न माननीय श्री.मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकटराव पाटील कवळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. लक्ष्मणराव पाटील हरेगावकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.संदीप पाटील कवळे कार्यकारी संचालक व्हीपिके उद्योग समूह मा.पूजाताई पाटील कवळे संचालिका व्हीपीके उद्योग समूह श्री.आंबटवार साहेब सरव्यवस्थापक श्री.पवार साहेब मुख्य शेतकी अधिकारी श्री.यु.जी कदम सर जन संपर्क अधिकारी श्री.रफिक साहेब शेतकी अधिकारी सौ.फुलझळके मॅडम मुख्याध्यापिका श्री.भिसे साहेब चीफ अकाउंटंट श्री.पडवाळे साहेब ऊस विकास अधिकारी श्री. सावंत साहेब ऊस विकास अधिकारी श्री. कदम साहेब कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रदीप पाटील सावंत श्री. जाधव साहेब श्री. मेटकर साहेब श्री. वाघ साहेब श्री. उमाटे साहेब श्री. बोमले साहेब, श्री. नव्हाते साहेब, श्री. मोरे साहेब उपस्थित होते. सावित्रीबाई फुले, जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. व शालेय विध्यार्थ्यांना दप्तर, खाऊ वाटप करण्यात आले.
मा. मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर दि १ जानेवारी पासून शाळेतील विध्यार्थ्यांना “शालेय पोषण आहार” शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. यु. जी. कदम सर यांनी केले,व्यंकटराव पाटील कवळे विद्यालय हे १ ली १० वी पर्यंत करण्याचे आश्वाशित केले. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत असे सांगितले. आपल्या प्रास्ताविकातून मा. कवळे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या. पुढे मा. संदीप पाटील कवळे सर यांनी मा.कवळे सरांविषयी अतिशय चांगल्या प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले. व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . मा. पुजाताई पा. कवळे यांनीही आपल्या मनोगतातून मा. कवळे सर यांचा जीवनप्रवास, यशस्वी उद्योजकाचे स्वप्न कसे साकार झाले याविषयी सखोल माहिती सांगितले.व मा. कवळे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अध्यक्षीय भाषांनातून श्री. लक्ष्मणराव पा. हरेगावकर यांनी मा. कवळे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला श्री. धनशेट्टी सर श्री. संतोष ढगे सर श्री. संतोष जाधव सर श्री. वाघमारे सर सौ. भोसले मॅडम सौ. जगदंबे मॅडम सौ. कदम मॅडम, सुरेश कदम शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कारखान्याचे कर्मचारी बंधू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शाळेचे सहशिक्षक विलास सोनकांबळे यांनी मानले.
