दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :- पैशामुळे या जगात मैत्री होऊ शकते, परंतु नाते विकत घेता येत नाहित.म्हणुन पैशापेक्षा
नाते महत्वाची असतात असे प्रतिपादन प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक(नागपुर )
यांनी रामकथा वाचनात प्रतिपादन केले.
ते कुरुळा येथील श्री भगवान बालाजी मंदिराच्या भव्य प्रांगणात श्री रामकथा आपल्या मधुर वाणीने सांगत होते.ते पुढे बोलतांना म्हणाले की, या जगातला असा एकही प्रश्न नाही की,ज्याचे उत्तर रामायणात नाही.भगवान राम,लक्ष्मण,भरत, छत्रगुण हे सावत्रभाऊ होते.परंतु त्यांच्यात सख्याभावापेक्षा जास्त प्रेम होते.आज वितभर जमिनीच्या थोड्या तुकड्यासाठी वैर निर्माण होते. ही गोष्ट मनाला दु:ख देते.भावाभावांच्या मध्य प्रेम असणे हे फार महत्वाचे आहे.असेही शेवटी त्यांनी सांगितले.२०२४च्या प्रथम दिवशी कुरुळा येथे श्री रामकथा सांगण्याचा त्यांचा योग आला.
कुरुळा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजी मंदिर येथे चतुर्दश वर्धापन सोहळा मिती मार्गशीर्ष कृष्णपक्ष ५ शके १९४५ दिनांक १ जानेवारी रोज सोमवार सुरुवात होत असून या सोहळ्याची दिनांक ७ जानेवारी २०२४ रोज रविवारी सांगता होणार आहे. रामकथेचे प्रवक्ते रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर हे राहणार आहेत. श्रीराम कथेची वेळ दुपारी दोन ते पाच पर्यंत असणार आहे.ब्रह्मोत्सव सोहळा हा दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारीला वेळ सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते सात या वेळेत होणार आहे. यासाठी पुरोहित म्हणून पंडित अर्जुन महाराज शास्त्री मध्यप्रदेश व पंडित घनश्याम पांडे मध्यप्रदेश यांच्या हस्ते होणार आहे. श्री भगवान बालाजी ची नगर प्रदर्शना दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत होणार आहे. मुख्य गायक व हार्मोनियम वादक म्हणून ह.भ.प. काशिनाथ महाराज पाटील जळगाव, तबला संगीत विशारद ह.भ.प. अश्विन कुमार मध्यप्रदेश, सहगायक ह.भ.प. निळोबा महाराज सूर्यवंशी हे राहणार आहेत.काल्याचे किर्तन वैराग्यमूर्ती नामदेव महाराज दापकेकर यांचे किर्तन दिनांक ८ जानेवारी रोज सोमवारी होणार आहे. काल्याचे किर्तन आरती आणि महाप्रसाद सकाळी दहा ते एक या वेळेत होणार आहे.
ही रामकथा ऐकण्यासाठी,विजय सावकार गुंडाळे,सुर्यकांत गबाळे,चंद्रकांत गबाळे,भागवत टोपले,
माजी उपसरपंच शिवदर्शन चिवडे,गोविंद मलशेट्टे,संतोष कोटलवार,बाबू गोमारे,दासराव गांजरे,सुरेंद्र कुलकर्णी, शिवाजी पस्तापुरे, बालाजी चिवडे,लक्ष्मण महाराज
श्रीमंगले,दता श्रीमंगले ,मारोती चिवडे, बाबु सावकार बंडेवार,घनश्याम महाराज पांडे,बालाजी होनराव, आत्माराम धुळगंडे,विनायक कुलकर्णी,हणमंतराव पा.बेद्रे,रामकिशन गंगावारे,घुमे भानुदास,रामकिशन घुमे,गोविंद घुमे,भानुदास गंगावारे, विठ्ठल
गंगावारे,नरसिंग नाईक,संजय देशमुख,विश्वनाथ पवळे,मलकार्जुन मठपती,नामदेव थोटे,बसवेश्वर मठपती,बालाजी बंडेवार,व्यंकटेश समुद्राळे यांसह
महिला-पुरुष,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
