दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड- जुलै २००५ पासून गरीब गरजू रुग्णांना रयत रुग्णालयत अत्यंत माफक दरात मल्टीस्पेलीटी ३० बेड ,अंतररुग्ण सेवा ज्यामघ्ये स्त्रीरोग , अस्थीरोग , जनरल मेडिसिन , त्वचा रोग , दंत रोग , पोटाचे विकार जनरल सर्जरी सोबत आघ्यावत लॅब , डीजटल एक्सरे व सर्व रुग्णासाठी ५०% दरात सिटीस्कॅन आशा सर्व सेवासाठी ठरलेल्या वेळात नामांकित तज्ञ डाॅक्टर सेवा देत आहेत आणी या कोणत्याही विभागात रुग्ण फक्त १०० रु नोंदणी फी भरुन बाह्य रुग्ण सेवांचा लाभ घेत आहेत . आता नविन वर्षात दि. ५ जाने २०२४पासून या सेवामध्ये लघवी विकार युराॅलाॅजी या विभागाची ही वाढ होत आहे*. ज्यासाठी शहरातील नामांकित डाॅ स्वप्निल सुनिल कदम, एम एस जन सर्जरी, एम सी एच युराॅलाॅजी, एफ एम एस, डी एम ए एस, हे मुत्ररोग तज्ञ दर शुक्रवारी दु. 1 ते 3 या वेळात ऊपलब्ध राहाणार आहेत .पात्र रुग्णांनच्या मोफत ऊपचारासाठी एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ऊपलब्ध आहेत.
विषेश बाब अपंगासाठी रयत मघ्ये जयपुर फुट ही माफक दरात बनवून दिला जातो. व रयतच्या फार्मसी मध्ये रुग्णांना लागणा-या जनरीक औषधीवर ४० ते ५०% व ईतर औषधीवर १० ते १५% सुट दिली जाते . ही औषधी सोय बाहेरील रुग्णांनसाठीही ऊपलब्ध आहे*. या माफक दरातील रुग्णसेवांचा लाभ गरजू रुग्णांनी घेऊन आपल्या आरोग्यावरील होणा-या खर्चात योग्य बचत करावी,असे रयत आरोग्य मंडळ यांनी कळविले आहे .
