दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):इंदापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ प्रतिष्ठान इंदापूर व माळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री संत सावतामाळी मंदिर (नविन) बावडावेस माळी गल्ली, इंदापूर येथील सभागृहात आज बुधवार दि.०३ जानेवारी रोजी पार पडला.
या रक्तदान शिबिरात ९५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात महिलांचाही समावेश होता. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू व प्रशस्तीपत्र माळी महासंघाचे पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विकास शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन बहुजन मुक्ती पार्टिचे महासचिव ॲड.राहूल मखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, पांडूरंग शिंदे, सुरेश गवळी,माजी नगरसेवक कैलास कदम, अनिल राऊत, पोपट शिंदे, दादासाहेब सोनवणे,बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव ॲड.राहुल मखरे,डॉक्टर सुहास सातपुते, वंचितबहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सुभाष खरे,उपाध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे, मनसेचे अध्यक्ष सुरेश व्यवहारे,राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष रमेश आबा शिंदे,माळवाडी चे माजी सरपंच दादासाहेब कुदळे, विठ्ठलवाडी गावचे माजी सरपंच सुनील बोराटे,निलेश शिंदे, बाळासाहेब व्यवहारे, संतोष शिंदे, निवृत्ती शिंदे, गोमाता इंगोले, नागेश शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बबन क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे, संतोष देवकर, नागेश शिंदे, सौरभ शिंदे,किरण शिंदे, शैलेश शिंदे,रवी शिंदे,बीएस ग्रुपचे अध्यक्ष बंटी सोनवणे,उमंग प्रतिष्ठान परिवार, अजिंक्य जावीर मित्रपरिवार,सागर आवटे,शुभम भैय्या पवार,सामाजिक कार्यकर्ते गौरव राऊत, रामभाऊ शिंदे,नाना खरात,माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच भैरवनाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिंदे वस्ती येथील पदाधिकारी आणि सर्व मित्र परिवार व पत्रकार बांधव आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर सायंकाळी विकास शिंदे, विष्णू शिंदे, सुरज शिंदे, अक्षय शिंदे, तुकाराम शिंदे, नागेश शिंदे, सोमनाथ रासकर यांनी राम मंदिरातील कळस पालखी ला खांदा देऊन वाजवत गाजवत बावडा वेस माळी गल्ली सावता माळी मंदिरात आणून पूजेचे आयोजन केले होते व या नंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच पुणे जिल्हा ग्रामीण माळी महासंघाचे अध्यक्ष विकास शिंदे, उपाध्यक्ष युवराज शिंदे, विष्णु शिंदे, पवन शैलेश शिंदे, ऋषिकेश किरण शिंदे, अनिकेत शिंदे, सोमनाथ शिंदे, बापू शिंदे, तुकाराम शिंदे, अक्षय गणेश राऊत,बापू राव शिंदे, रामचंद्र शिंदे, अमित, सुमित, निखिल, सुरज, ललित मोहित, स्वप्नील तुषार ढगे, अक्षय राऊत, सोमनाथ रासकर, भावड्या रासकर, भागवत शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
