दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :- ANC:- ड्रायव्हर कायदा लागू करा व नवीन ड्रायव्हर विरोधी हिट अँड रन कायदा पारित झालेला आहे. तो रद्द करा या मागणीसाठी कंधार येथे क्रांती वाहन चालक महासंघटनेच्या वतीने कंधार तहसीलवर निषेध मोर्चा काढण्यात आला.
गृहमंत्री अमित शहा यांनी भारत रोड अपघात बाबत संसदेत माहिती देताना सांगितले की. ड्रायव्हर अपघात झाल्यावर अपघातग्रस्ताला सोडून पळून गेल्यास सात लक्ष रुपये दंड व दहा वर्ष कारावास होणार अशी घोषणा केल्याने भारतातील सर्व वाहन चालकांमध्ये अस्वस्थता व संताप व्यक्त केला जात आहे.या विरोधात संपूर्ण राज्यभर चालक-मालक यांनी आंदोलन सुरू केलं आहे.याची दखल घेत हा कायदा माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. परंतु हा कायदा रद्द केल्याची वृत्तपत्रात सोशल मीडियावर कायदेशीर रित्या स्थगिती देण्यात आली नसल्याचे दिसून येत नाही. तेव्हा तशी घोषणा करून ड्रायव्हर संरक्षण कायदा लागू करावा.अशी मागणी वाहन चालक महासंघाकडून निवेदनाद्वारे मोर्चात करण्यात आली.
