दैनिक चालू वार्ता देगलूर
प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर९) ; दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, योगासने करणे हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही चांगले असते. योगदिनाचे दिनाचे औचित्य साधून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे आज दिनांक 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या वेळी योगशिक्षक म्हणून अमरजी वाघमारे तर अध्यक्षस्थानी डॉक्टर किरणजी सगरेपाटील- प्रणव निसर्गोपचार केंद्र, कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेशजी बिरादार उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष यांनी मनोभावे करा योग होचाला निरोग या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे आधीक्षक सुजितजी बिरादार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आम्रपाली सरवदे, विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी रामेश्वरजी सगरे, विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[6/22, 6:04 PM] +91 99226 46195: मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवा
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :मराठा आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून चर्चा घडवावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. या मागणीचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांना गुरुवारी दिले.
पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत होत आहे. मराठा समाजाच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि सगे-सोयऱ्यांच्या निकषात बसणारे आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागत आहे. सरकार या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशनातील एक दिवस मराठा आरक्षणासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. यावर्षी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले, त्यातील तरतुदी आणि जानेवारीमध्ये वाशी येथे जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या अश्वसानामध्ये फरक आहे. त्यामुळे जरांगे पाटील मागील आठवड्यात पुन्हा उपोषणास बसले होते. सरकारच्या आश्वासनाचा मान ठेऊन त्यांनी १३ जुलैपर्यंत उपोषण स्थगित केले आहे. फेब्रुवारीमध्ये आरक्षणाचा निर्णय घाईने घेतल्यामुळे आरक्षणाची वैधता आणि तरतुदी याबद्दल मराठा समाजामध्ये संशयाचे वातावरण आहे. याकडेही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.
