दै.चालु वार्ता प्रतिनिधी
अशोक कांबळे
गारगोटी : यळगुड हायस्कूलचे माजी विद्यार्थी विशाल पाटील यांनी आपली पत्नी सौ.सुनीता विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.
वाढदिवस म्हटले की सध्या ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात इव्हेंट केले जात आहेत. केक कापणे, जेवणावळीचे आयोजन करणे, फटाक्यांची आतषबाजी करणे, असा बडेजाव दिसून येतो.
यळगुड येथील यळगुड हायस्कूल चे माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक विशाल पाटील यांनी आपल्या पत्नीचा वाढदिवस साधेपणाने करण्याचा निर्णय घेतलाच त्याचबरोबर आपण ज्या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत त्या शाळेतील विद्यार्थी हुशार आणि होतकरू आहेत हे त्यांच्या लक्षात आले आणि दोघा उभयतानी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला.
मुख्याध्यापक आर. डी. सारंग यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून शाळेप्रती जी बांधिलकी त्यांनी जपली त्याबद्दल अभिनंदन केले.
ए.एस.कांबळे सर यांनी प्रास्ताविक केले. एम.एन. सदलगे,एम.आय.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
जयश्री पाटील,सूर्यकांत गोटखिंडे, कपील पवार, चंद्रकांत कुंभार उपस्थित होते.
