दै. चालु. वार्ता :-
समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर : ( नाटे ) :- बज्मे उर्दु अदब संचलित नॅशनल इंग्लिश स्कूल अँन्ड ए.ई कालसेकर ज्युनिअर कॉलेज, रानतळे, राजापूर या संस्थेने साखरी नाटे येथील स्थानिकांच्या आग्रहास्तव व लहान मुलांना प्रवासाचा त्रास होऊ नये याचा विचार करुन संस्थेने श्री.मुआजम वाडकर ग्रा. घर क्रमांक १२७७, गणेश नगर, नाटे येथे नर्सरी, ज्युनिअर के.जी., सिनियर के.जी. हे तीन के.जी. चे वर्ग सुरु केले. या शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री.असिफअली चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.ग्रामीण भागातील मुलाना चांगले शिक्षण घेता यावे,आणि इंग्रजी माध्यमातून मुलांनी जावे या उद्धेश डोळ्यासमोर समोर ठेऊन आज या शालेय वर्गाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाटे येथील आर,डी. सी.सी , बँकेचे संचालक तथा समाजसेवक श्री. आमजद भाई बोरकर , राजापूर अर्बन को. ऑप.बँक लि. चे मा. अध्यक्ष व संचालक श्री. हनीफ मुसा काजी हे उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श्री.शकील अहमद मोकाशी यांनी प्रस्तावना केली. संस्थेचे उपाध्यक्ष श्री.कमालुद्दीन मापारी यांनी संस्था स्थापने पासून आजपर्यंतच्या संस्थेने कशा प्रकारे कार्य केले त्या बाबतची माहिती देवून पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे श्री. हनीफ मुसा काजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या संस्थेने नाटे येथे के.जी.चे वर्ग सुरु केल्याबद्दल धन्यवाद दिले असून संस्थेचे चांगल्या प्रकारे काम सुरू असून माझ्याकडून जे काही संस्थेसाठी सहकार्याची गरज असेल ती मी पूर्ण करेन असे आश्वासन दिले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. आमजद बोरकर यांनी संस्थेचे व शाळेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात संस्थेचे सचिव श्री.नुरुद्दीन काजी खजिनदार श्री.शरफुद्दीन शेमना सदस्य श्री. अ.सलाम खतीब, श्री. कलीम चौगुले,श्री. शमसुद्दीन काजी,श्री. शकील काजी यांच्यासह ग्रामपंचायत साखरीनाटेच्या सरपंच सौ. गुलझार ठाकूर, ग्रामपंचायत साखरीनाटेचे माजी सरपंच श्री.मलिक गडकरी, मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष श्री.शफी वाडकर, श्री.मुजाहिद हुना,श्री.वजुद बाबजी, श्री.समीउल्ला वाडकर राजापूर अर्बन बँक शाखा नाटेचे व्यवस्थापक श्री.बांधकर व मोठ्या संख्येने पालक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह. शिक्षिका सौ. सैरीना सोलकर यांनी केले तर आभार सना फडणीस यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता झाली..
