दै.चालू वार्ता
उपसंपादक आष्टी
अवधूत शेंद्रे
अमरावती – तिवसा :-संत अच्युत महाराजांनी वयाच्या ८५ वर्षापर्यंत ११० संस्कृत धर्मग्रंथाचे मराठीत रूपांतर केले म्हणून त्यांना विदर्भाचे ज्ञानेश्वर महाराष्ट्राचे आधुनिक व्यासमणी म्हणतात असे उदगार श्री संत सचिन देव महाराज यांनी तिवसा नजीकच्या शेंदूरजना बाजार येथे स्व. सुशिलाबाई प्रभाकरराव वाडेकर स्मृति अभ्यासिकेचे उद्घाटक म्हणून आपले मत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल सावरकर, डॉ. श्रीकांत देशमुख, मनोज वाडेकर, पोलीस पाटील शितल भोजने यांची उपस्थिती होती मार्गदर्शनपर कार्यक्रमापूर्वी श्री संत सचिन देव महाराज यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले आणि श्री संत अच्युत महाराज यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला पुढे बोलताना संत सचिन देव महाराज म्हणाले की, वाडेकर बंधूंनी आई-वडिलांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्व.सौ. सुशिला प्रभाकर वाडेकर स्मृती अभ्यासिका स्थापन केली असून याचा विद्यार्थ्यांसह वाचकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल शेंदूरजना गावात ७० वर्षांपूर्वी संत अच्युत महाराजांचे चरण स्पर्श झाले त्याच दिवसापासून सत्य ज्ञानाचे पीठ शेंदुरजना गावात आत्मज्ञान जागृत करण्याचं वाचनालय सुरू झालं होतं संत अच्युत महाराज ज्या ठिकाणी पोचलेत त्या ठिकाणच्या उणिवा भरून काढणे असे महाराजांचे कार्य होते, समाजाच्या हिताकरता निर्माण झालेले सत्यज्ञान म्हणजे साहित्य डोक्यातून स्फुरनार साहित्य हे मनोरंजन निर्माण करते तर हृदयातूनच स्फुरनार साहित्य हे जनतेचे मतपरिवर्तन करत असून असे श्रेष्ठ साहित्य निर्माण करणारे द्रष्टा संत म्हणजे अच्युत महाराज होय संपूर्ण भारतामध्ये फक्त संत अच्युत महाराजांनी संस्कृत भाषेतील वेद मराठी भाषेत अनुवाद करून दिल्याचे पहावयास मिळतात तर गोरगरिबांची निस्वार्थ आरोग्य सेवा म्हणून मार्डी येथे हार्ट हॉस्पिटल उभे केले आहे असे आपल्या मार्गदर्शनपर शब्दात मत व्यक्त केले यावेळी डॉ.अनिल सावरकर, डॉ.श्रीकांत देशमुख, मनोज वाडेकर, शितल भोजने यांची भाषणे झालीत कार्यक्रमाची सुरुवात रघुनाथदादा कर्डीकर यांच्या मार्गदर्शनातील स्वागत गीताने झाली कार्यक्रमादरम्यान प्रकाश देशमुख, निखिल टेंभरे, श्रीराम सावरकर, पवन भोजणे, चंद्रकांत उंबरकर तर दत्तात्रय वाडेकर, मुरलीधर वाडेकर, मनोज वाडेकर या तीन बंधूंचा सपत्नीक सत्कार संत सचिन देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला अभ्यासिकेला सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.आर.बनसोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा दान केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण बोडखे यांनी तर आभार माजी सरपंच वामनराव भोजने आणि सूत्रसंचालन प्राजक्ता राऊत यांनी केले उद्घाटन सोहळ्याची सांगता तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा या राष्ट्रसंतांच्या राष्ट्रवंदनेने झाली
टीप :- सदर बातमीला फोटो आहे
