प्राजक्ता माळी प्रकरणावर किरण मानेंची खोचक पोस्ट
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. यानंतर एकच गदारोळ झाला. अभिनेत्री प्राजक्ता माळीने याप्रकरणी महिला आयोगाकडे धाव घेत सदर तक्रार दाखल करत या गोष्टीचा निषेध केला.
प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत या सगळ्यावर प्रत्युत्तर देत नाराजी व्यक्त केली. या गोष्टीचा जाहीर निषेध करत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण मराठी इंडस्ट्री प्राजक्तासाठी पुढे सरसावली. मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला. अभिनेते किरण माने यांनाही या प्रकरणाचा निषेध करत प्राजक्ताला पाठिंबा दिलाय मात्र त्यांच्या खोचक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेते किरण माने नेहमीच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिले आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयावर ते नेहमीच व्यक्त होताना दिसतात. प्राजक्ता माळी आणि सुरेश धस प्रकरणात किरण माने यांनी खोचक पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे.
करुणा ताई इथून पुढे कुठलीही खातरजमा केल्याशिवाय.., प्राजक्ता माळीला अश्रू अनावर
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, “प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीयच आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते… कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या… मणिपूरला भगिनींची विटंबना झाली… तेव्हा जे महाभाग मुग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक भयानक ‘समस्त महिलावर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे!
सुमारांचा_थयथयाट”
