दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छत्रपती संभाजीनगर (पैठण) : संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीकृष्णाने 12 वर्षे श्रीखंड्या हे नाव धारण करुन ज्या रांजणात पाणी भरले त्या रांजणाची पूजा आज गावातील नाथमंदिर येथे उत्साहात संपन्न झाली. संस्थान व सालकऱ्यायांच्या वतीने नाथवंशज वेणीमाधव ऊर्फ सरदार महाराज गोसावी, छैय्या महाराज, हरिपंडीत महाराज, मेघशाम महाराज यांनी नागेशगुरु उपाध्ये, सौरभगुरु पोहेकर यांसह ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पवित्र अशा रांजणाची पूजा केली. या प्रसंगी सालकरी योगिराज महाराज, ज्ञानराज महाराज यांसह विनित महाराज, विठ्ठलबुवा, भगवानबुवा,, श्रीरंगबुवा, मिथिलबुवा, शुभमबुवा, चैतन्यभाऊ, आदींसह शेकडो भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. नाथवंशीय सौ. भाग्यश्री वेणीमाधव गोसावी यांच्या हस्ते प्रथम घागर रांजणात ओतुन पवित्र रांजण भरण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर नाथवंशीय महिलांसह इतर महिलांनी गोदावरीचे पिवित्र जल रांजणात टाकले.
