दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
तलासरी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साई अकॅडमी, तलासरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांची वजन तपासणी, रक्ततपासणी, बीपी, शुगर आणि सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली.हे शिबिर स्माईल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. NCR, अटलोस स्माईल फाउंडेशन, दिल्लीचे स्वास्थ्य वरिष्ठ व्यवस्थापक मो. अमिल यांच्या आदेशानुसार आणि के. एम. सोनटक्के (सामुदायिक आरोग्य अधिकारी, स्माईल फाउंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर पार पडले.कार्यक्रमात चिकित्सा अधिकारी डॉ. नलिन, सामुदायिक आरोग्य अधिकारी के. एम. सोनटक्के आणि ए.एन.एम. अनुसया गावित यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना स्माईल ऑन व्हील्स द्वारे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, आरोग्य जनजागृतीवर विशेष मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये ए.एन.एम. अनुसया गावित, कम्युनिटी मोबिलायझर अश्विनी माळकरी, आणि ड्रायव्हर सुमित सांबर यांचे विशेष योगदान राहिले.SoW_NCR, पालघर यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेला चालना मिळाली. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा संस्थेने संकल्प केला आहे.
