प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं; सारंगींकडे संशयाचे बोट…
प्रकाश महाजन यांनी स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून सनसनाटी खुलासा केला आहे. प्रवीण महाजन भावाला प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते.
ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालत होतं ती व्यक्ती आजही जिवंत आहे, त्यामुळे त्याचं नाव घेत नाही, असं म्हणत एबीपी माझाशी बोलताना सनसनाटी दावा केला. प्रमोद महाजन यांची हत्या ही फक्त पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाल्याचेही प्रकाश महाजन म्हणाले.
दरम्यान, प्रकाश महाजन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी सर्वआरोपफेटाळूनलावलेआहे. तरयावरपुन्हा प्रमोद महाजनांच्या हत्येबाबत दुसरा मोठा संशय व्यक्तकरत प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांनापुन्हालक्ष्यकेलंआहे.
नवऱ्याचं पाप झाकण्यासाठी प्रमोद महाजनाबद्दल बोललं जातंय
प्रमोद महाजन यांच्या हत्येसाठी सारंगी महाजनांची फूस होती का हा संशय आहे. सारंगी महाजनांमुळेच माझा छोटा भाऊ बिघडला. नवऱ्याचं पाप झाकण्यासाठी प्रमोद महाजनाबद्दल बोललं जात आहे. त्यांच्या खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रे देखील खाल्ल्यांनंतरजागतं, तुम्ही त्या पुढे गेलात, अशाप्रखरशब्दात प्रकाश महाजनांनी बोचरी टीका केलीय. पंकजा मुंडे यांच्या तोंडचा घास यांनी हिरावला, पंकजा काही बोलत नाही, हे तिचं मोठेपण आहे. मला कुणी सांगायला मी लहान नाही. सारंगी महाजन यांचे आजपासून सर्व संबंध तोडतो, यापुढे मी जिवंत असेपर्यंत कोणताही संबंध ठेवणार नाही, असेही प्रकाश महाजन म्हणाले.
भाऊ भावाला केलेल्या मदतीच्या पावत्या लिहून ठेवत नाही
प्रवीण महाजन यांना साधा ग्रॅज्युएट असताना रिलायन्स कंपनीत एक लाख पगाराची वीस वर्षांपूर्वी नोकरी प्रमोद महाजन यांच्यामुळेच लागली. ते नोकरीवर जात नव्हते, भाऊ भावाला केलेल्या मदतीच्या पावत्या लिहून ठेवत नाही. असेम्हणत सारंगी महाजन यांच्या आरोपांवर प्रकाश महाजन यांची सडकून टीका केलीय. त्यामुळेआता महाजन कुटुंबातला वाद आणखीन चिघळला असूनहावादानेराज्याच्याराजकारणातमोठीखळबळउडालीआहे.
