दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रखर तेजाने तळपता सुर्य
संध्यासमयी मावळला तरी
पहाटेच्या मंद प्रकाशात
प्राजक्त बहरण्यासाठी,त्याचे अस्तित्व अबाधित असते,प्रभात समयी त्याच्या अस्तित्वाच्या केवळ
सुखद जाणीवेने
प्राजक्ताचा सुगंध सर्व आसमंत दरवळून टाकतो.
त्याचप्रमाणे.
तुझे परिश्रम, कष्ट एवढेच नव्हे तर तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाने
आमच्या जीवनाचा मार्ग
प्रकाशमय करून तु दृष्टीआड गेली असलीस तरी,आजही तुझे अस्तित्व आमच्या जीवनाचे मार्ग सुकर करण्यास अबाधीत आहे.
जीवन गाणे गाता गाता,
आयुष्यातील सुखदुःखाचा
हिशोब मांडताना
जाणीव होते आहे
क्षणोक्षणी,पावलोपावली
तुझ्या मायेची,प्रेमाची,कष्टाची,प्राजक्ताच्या परीमला प्रमाणे
दरवळेल आमच्याही यशाचा,किर्तीचा परीमल,जो दाही दिशा व्यापुन
निरंतर साक्ष देईल
तुझ्या अस्तित्वाची,कारण.
आमच्या यशस्वी जीवनाच्या वाटेवर अजुनही गरज आहे ती निरंतर तुझ्या आशिर्वादाची.
म्हणुनच, प्रत्येक कार्यारंभी होणारी तुझ्या अस्तित्वाची
जाणीव पेटविते अंत:र्मनाला,आणी निर्माण करिते
शरिरांतर्गत एक नवऊर्जा
संपूर्ण आभाळ पेलण्याची.
स्फुर्ती मिळते तुझ्या
अस्तित्वाच्या जाणीवेने,आयुष्याची स्वप्न पूर्ण करण्याची.
नतमस्तक होऊनी तुझ्या चरणावरी,एकच मागणे मागते,”आई”
सदैव असावा कर, तुझा आमच्या शिरावरी.
प्रा.डाॅ.आशु आल्हाद भावसार… संजय धारस्कर
