दैनिक चालु वार्ता भिगवण प्रतिनिधी :जुबेर शेख
डिकसळ ( ता.इंदापुर) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशाअखेर १३ जागेसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत १ उमेदवारी अर्ज नामंजुर झाला त्यामुळे १६ उमेदवार रिंगणात उतरले होते परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३ उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज राहिल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी एम.पी.राऊत यांनी जाहीर केले.
योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा संस्थेची स्थापना १९६० साली झाली होती. गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात मागील पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद वगळता या संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. शेतकऱ्याचा आर्थिक कणा म्हणुन या संस्थेकडे पाहीले जाते.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण
गायकवाड विजयकुमार भगवान,हगारे आबासो लालासो,हगारे संतोष धोंडीबा,सुर्यवंशी तानाजी जगन्नाथ,कुंभार कैलास अनंता,पोंदकुले जिजाराम दादा,काळे सतीश उत्तमराव,पवार अशोक साहेबराव
अनुसूचित जाती /जमाती
गवळी रावसो भाऊसो
विजा/ भज/ विमा प्रवर्ग राखीव
पोंदकुले धनुलाल हरीदास
इतर मागासवर्ग राखीव
भोंग लहु गणपत
महीला राखीव
हगारे जयश्री चंद्रकांत,भोसले नयना निलेश
या निवडणुकीत नवे-जुने चेहरे तसेच काही तरुण तर काही अनुभवी उमेदवारांना संधी दिल्यामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आता चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
