दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
सामाजिक, धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे अष्टपैलु व्यक्तिमत्व तथा भा.ज.प.नांदेड दक्षिण भाजपाध्यक्ष सुनील भाऊ मोरे ,सोनखेड परिसरातील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे विश्वासू समर्थक यांचा वाढदिवस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी दिलीप भाऊ कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ साले, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड साहेब, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, व्यंकटेश मोकले,संतुकराव हंबर्डे,राजेश पावडे जिल्हा सरचिटणीस, विरभद्र राजुरे,रंगराव पाटील लोंढे ,माधव पाटील सावंत पाटील ,विक्रम पाटील कदम,गंगाधर पाटील ,रामेश्वर पाटील किरवले,आदींची यावेळी उपस्थिती होती सोनखेड नगरीचे भूषण, राजकारणातील कोहिनूर हिरा, जनतेच्या सुखा-दुःखात सहभागी होणारे युवानेतृत्व,ईतकेच नाही तर प्रत्येक खेड्यापाड्यात गोरगरीब माणसाची काळजी घेण्यात सदैव, तत्पर असणारे आमचे भाऊ, कसल्याही प्रसंगात असोत समोरच्या व्यक्तीला स्मितहास्याने शांत करणारे सुनील भाऊ मोरे,सदैव संयमी असणारे पण वेळप्रसंगी समयसुचकतेने वागणारे सोनखेड नगरीचे नव्हे तर नांदेड दक्षिण परिसर व सोनखेड सर्कल मधील एक जिद्दी नेता,राजकारणधोरणी युवानेते सुनील भाऊ मोरे ,तशी त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच पदावर काम पाहिले आहे,जिल्हा परिषद उमेदवार म्हणून अपक्ष एकावेळेस व पक्षाकडून दोन वेळेस जिल्हा परिषद निवडणुकीत सोनखेड सर्कल मधुन निवडणुक लढवली आहे पण निसटता पराभव झाला आणि आता तर भाजपाध्यक्ष आहेत व जनतेचा आशिर्वाद आहे.
सोनखेड परिसरात त्यानी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात ते यशस्वी झाले आहेत,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्त्येक गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांस शालेय साहित्य वाटप असेल,रक्तदान शिबीर आयोजन असेल ,दवाखान्यातील रूग्णांना फळे वाटप असतील,वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमात प्रसिद्ध किर्तनकरांचे किर्तन ठेवुन समाजात प्रबोधन करण्याचे कार्य सुनील भाऊ यांनी केले आहे.आपल्या सोबत असणारे कार्यकर्ते यांना प्रेमाने बोलणे,विविध उपक्रम राबवून कार्यक्रम घेवुन कार्यकर्ते एकसंघ ठेवण्याची वृत्ती असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वात आहेत ,शैक्षणिक कार्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्लिश स्कूल स्थापन करून गरीब, मध्यम वर्गीय कुटुंबातील विद्यार्थी यांचे इंग्लिश मीडियम स्कूलचे स्वप्न पूर्ण होत आहे,जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे,कोरोणाच्या काळात जनसंपर्क ठेवणारे सर्व युवक, ज्येष्ठ, मंडळीचे सोनखेड येथील बहुआयामी नेतृत्व असणारे आम्हा सर्वांचे लाडके युवानेते सुनील भाऊ मोरे यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्त त्यांना श्री संत तुकाराम महाराज यांच्याकडून आशिर्वाद मिळावेत आई तुळजा भवानी मातेकडुन शक्ती मिळावी,छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आशिर्वाद मिळावेत, सिध्दिविनायक देवतेकडून बुध्दी मिळावी,कपिलेश्वर देवतेकडून सामर्थ्यवान मिळावी,सोनभर्डी सोनाई मातेकडुन ,आशिर्वाद मिळावेत, परिसरातील संत माधवबुवा शेंबाळे यांचे आशिर्वाद मिळावेत व जनताही आशिर्वाद देणारच आहे .श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडून आशिर्वाद मिळावेत, आजच्या शुभ दिनी भावी जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ मोरे याना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…..
