दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:देगलुर शहरातील इंग्रजी शाळांमधील अनियमितता, आरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार शहरात वाढल्याने इंग्रजी शाळांची तपासणी करावी. ह्या मागणीचे निवेदन भागवत पाटील सोमुरकर यानी उपजिल्हाधिकारी देगलुर याना देण्यात आले आहे.आरटीई अंतर्गत मुलांना मोफत प्रवेश आसताना यात अनेक शाळांमध्ये शासन दिलेल्या नियमांची पायमल्ली करत आसल्याचे पालकाकडुन शिवसेना कार्यालया कडे तक्रारी येत आहेत, इंग्रजी शाळे कडून नियमाची पायमल्ली करत आहेत आसे निर्देशनास येत आहेत,मागील काही वर्षात इंग्रजी शाळांची संख्या वाढली. बाल हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देणे बंधन कारक आहे, अनेकदा प्रवेश देण्यास शाळांकडून टाळाटाळ केली जाते. त्यासह अनेकदा शुल्काबाबतच्या तक्रारी ही समोर येतात. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या तपासणी करायला पाहीजे, तपासणीमध्ये शाळेची मान्यता, शाळा सुरू करताना त्याची परवानगी कोणत्या ठिकाणी घेतली आहे, स्थंलांतर केले तर ते नियमात आहे की नाही, निकषांची पूर्तता केली जाते की, नाही. मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये २५ टक्के जागांवर निश्चित प्रवेश देण्यात आले किंवा नाही. भौतिक सुविधा याबाबत समितीकडून तपासणी केली गेली पाहिजे, मोफत प्रवेश प्रक्रियेत अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहेत. अनेकदा पालकांकडून शुल्कवाढीच्या तक्रारी केल्या जात आहेत. या सर्व बाजुचा विचार करुन शहरातील सर्व इंग्रजी शाळांची चौकशी करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन शिक्षण मंत्री व उपजिल्हाधिकारी देगलुर याना देण्यात आले आहे.
