दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- रामेश्वर केरे
इप्का लेबोरेटरीज वाळूज येथे जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त कारखान्यात काढण्यात आलेली वृक्षदिंडी जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्ताने कारखान्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये भारतातील पारंपारिक वेशभूषा , गायन स्पर्धा, कथा कविता, सुरक्षितता, स्वच्छता इत्यादी इत्यादी सोमवारी रोजी कारखान्यात वृक्षदिंडी मिरवणूक मिरवणूकीने मान्यवरांच्या हस्ते भक्ती भावात प्रसन्न वातावरणात वृक्षारोपण करून सर्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्तेबक्षीस वाटप करण्यात येऊन मोठ्या उत्साहात थाटामाटात या सप्ताहाची सांगता झाली. या सांगता सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध उद्योजक मनोज कदम, श्रीराम दहिफळे , सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, संचालनालय मराठवाडा विभाग, औरंगाबाद, वृक्ष बँकेचे निर्माते पोपटराव रसाळ ,उद्योजक अमृत मराठे, श्री स्वामीनाथ केदार, प्लांट हेड संजय चौबे, मनुष्यबळ विकास प्रमुख श्री व्यंकट मैलापुरे, सुरक्षितता विभाग प्रमुख अजिनाथ सुरवसे, फॅक्टरी मेडिकल ऑफिसर डॉक्टर माधवी सावंत, तसेच सर्व विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
