दैनिक चालु वार्ता भिगवन प्रतिनिधि: जुबेर शेख
भिगवन स्टेशन :महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तसेच सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसा निमित्त भिगवन स्टेशन चे राष्ट्रवादी चे युवक अध्यक्ष सुरेश बिबे व भारती बिबे यांनी भिगवन स्टेशन मधे विविध कार्यक्रम आयोजित करुण समाजामधे आदर्श निर्माण केला त्यामध्ये मामांच्या दीर्घायुष्यासाठी अष्टभुजा तुळजाभवानी मंदिर भिगवन स्टेशन या ठिकाणी सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत महापूजा ठेवण्यात आली होती त्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 महाराष्ट्राचा लाडका आवाज आवाजाचे जादूगार ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन ठेवण्यात आलं होतं संध्याकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये पाच भाग्यवंत महिलांना पैठणी अनुक्रमे सारिका ताई कदम,ललिता ताई सस्ते, सुमनबाई गावडे,नंदाबाई जाधव, शारदाबाई मत्रे यांना वाटप करण्यात आले.संध्याकाळी 9:30 च्या पुढे भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते अशा एक वेगळ्या पद्धतीचे नियोजन करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रम भिगवन स्टेशन च्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणामधे पार पडला.
यावेळी दत्तात्रय भरणे यांच्या बद्दल ह. भ. प. पुरषोत्तम महाराज पाटील यांनी गौरवउदगार करताना सांगितले, “मागील दोन वर्ष कोरोना सारख्या भयंकर अशा आजाराने पूर्ण देशामध्ये धुमाकूळ घातला होता प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी होती प्रत्येक जण घाबरून घरात बसला होता अशा वेळी घरातून बाहेर पडून काम करणाऱ्यांमध्ये दत्तात्रय मामा भरणे हे नंबर 1 ला होते लोकांना अन्नधान्याचे किट वाटणे, दवाखान्याची सोय करणे, औषधोपचार सगळ्यांना व्यवस्थित भेटेल याची काळजी करणे या सर्व गोष्टी प्रामुख्याने मामांनी जपल्या होत्या, इंदापूर तालुक्यातील काही भाग जिराईत आहे लोकांकडे जमिनी असून सुद्धा त्या पिकवता येत नव्हत्या आणि त्यामुळे सर्वांची परिस्थिती हालाखीची होती पण मामाचं एकच धोरण होतं आपला इंदापूर तालुका सुजलाम-सुफलाम कसा होईल याकडे विशेष लक्ष असते. लाकडी लिंबोडी सारखा पाण्याचा प्रकल्पाच्या माध्यमातून खूप दिवसापासूनचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याचे समाधान प्रत्येक शेतकरी करत आहे.ना. दत्तात्रय भरणे यांचे कार्य हे नेहमी सर्व सामान्य लोकांसाठी असते असे प्रतिपादन ह भ प पुरषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी भिगवन परिसरातील जेष्ठ नागरिक, तरुण आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
