दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी- पंकज रामटेके
नुकत्याच झालेल्या ५ जून “जागतिक पर्यावरण दिवसाचे” औचित्य साधून ६ जुन घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे आणि दिपक पेंदोर यांनी नगरपरिषद घुग्घूस ला निवेदन देऊन
घुग्घूस शहरात या पावसाळ्यात “भव्य वृक्षारोपण मोहीम” राबविण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली.
तसेच अशाच प्रकारची मोहीम लाँयड्स मेटल कंपनी, ए.सी.सी. कंपनी व वेकोली कंपनी यांनी सुद्धा राबवावी, अशी सुचना वजा विनंती नगरपरिषद तर्फे या कंपन्यांना करण्यात यावे, असे सुचविण्यात आले.
घुग्घूस हे औद्योगिक वसाहत असून प्रदूषणाच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर आहे. येथील नागरिकांना निदान शुद्ध पर्यावरण, शुद्ध हवा, शुद्ध आँक्सिजन मिळाव याकरिता सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे, दिपक पेंदोर आणि त्यांचा मित्रपरिवार गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमातून पर्यावरण आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करीत आहे. या वर्षीही त्यांनी पर्यावरणाबद्दल सामाजिक बांधिलकी ठेवत नगरपरिषद घुग्घूस ला या पावसाळ्यात गावात मोठी वृक्षारोपण मोहीम राबवावी, अशी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
