दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
धरणगाव, नरवेल: दि.१० जिल्हा परिषद गटातील धरणगाव पंचायत समिती गणातील माजी सभापती सौ.लताबाई विजय वानखडे यांच्या स्वतःच्या गावात दलित वस्ती योजने अंतर्गत पाच लाख रुपयांच्या निधीतून कॉंक्रीट रस्त्याचे काम झालेले असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्या कामात मातीमिश्रित रेतीचा वापर केलेला असून ते अंदाज पत्रका नुसार झालेले नाही. रस्त्याची लांबी १८ मीटर असे दोन्ही रस्ते सलग्न केले आहे. अंदाज पत्रका नुसार स्टील वापर नमूद आहे ,परंतु प्रत्यक्ष स्टीलचा वापर केलेला नाही. तसेच रस्त्यांची उंची सुद्धा कमी आहे.सदर कामाची गुणवत्तायादी नियंत्रण कक्षा कडून चौकशी केल्याशिवाय मंजूर देयक करू नये. सदर कामाची चौकशी अहवालाची मागणी केली आहे.मलकापूर पंचायत समिती अंतर्गत दलित वस्तीच्या रस्त्यांची किंवा गटार व अन्य कामे सुद्धा अशाच पद्धतीने संबंधित शाखा अभियंता ने केले आहे का?. असा प्रश्न उपस्थित होत आहे.निवेदनाची प्रत माजी सभापती सौ. लताबाई विजय वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी परिषद,बांधकाम उपविभागीय मलकापूर यांचे सह पालकमंत्री राजेंद्र शिंगणे बुलढाणा ,मा. राजेश इकडे मलकापूर मतदार संघ आमदार, मा. मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बुलढाणायांना निवेदन सादर केले आहे.व झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
