दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
विसापूर गाव मधील चंद्रपूर जि.माझी पालकमंत्री मा.श्री विजय भाऊ वड्डेटीवार, चंद्रपूर वाणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री बालूभाऊ धानोरकर
जिल्हाध्यक्ष ग्रा.काँग्रेस कमिटी चंद्रपूर मा.श्री प्रकाशभाऊ देवतळे देवतळे,तालुका अध्यक्ष ग्रा.कमिटीमा.श्री विनोद बुटले,बल्लारपूरचे जेष्ठ नेते काँग्रेस मा श्री.घनश्यामजी मुलचंदणी,प्रदेश महासचिव शिवानीताई वड्डेटीवार महाराष्ट्र यु काँग्रेस,जिल्हाअध्यक्ष शंतनूभाऊ धोटे यु काँग्रेस चंद्रपूर,जिल्हा उपाध्यक्ष मा.रमीजभाई शेख यु.काँग्रेस चंद्रपूर यांचा मार्गदर्शनाखाली व विसापूर गावमधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव यु काँग्रेस चंद्रपूर यांचा नेतृत्व मधील विसापूर गाव-मधील सर्व शेतकऱ्यांनाचे मार्गदर्शनाखाली कोलगाव-नदी कडे जाणार मार्ग(रस्ता) तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे व विसापूरगाव पंदन रस्ते चे समस्याकडे सुद्धा लक्ष केंद्रात करण्यात यावे असे निवेदन मार्फत विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला मागणी करण्यात आले कारण कि गाव मधील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतामध्ये जाणे येणे-साठी बैलांना रस्ता खराब असलेल्यामुळे त्रास दायक परिस्थिती निर्माण होत असून शेतकऱ्यांना सुद्धा अडचण निर्माण होऊन आहेत म्हणून या सर्व बाबी लक्षात घेता विसापूर ग्रामपंचायतकडे रस्ता दुरुस्ती चे मागणी निवेदन मार्फत करण्यात आले आहेत
