दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
================
सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रामदास कदम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
=================
मुंबई : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होत आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर भवदिव्य दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रामदास कदम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘तुम्ही हिंदुत्व जपणारे ? बीकेसीमध्ये इव्हेंट करणारे ? अनेक जण हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेल्याचे सांगत आहेत. किरण पावसकर शिवसेनेत होते. अजित पवारांनी चॉकलेट दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मग मिंधे गटात गेले. सहा वर्ष कुठे होते ?’
‘नारायण राणे तुमच्या पुत्रांवर बोलणार नाही. पण तुम्ही शहाणे आहात. नारायण राणे विसरलात का? सोनिया गांधी यांच्या पायावर लोटांगण घालत आमदार, खासदार, महसूल मंत्री झाले. आता शहाणपण सांगत आहात ?, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंवर टीका केली.
रामदास कदम यांनी शिवसेनेला ब्लॅकमेल करून राष्ट्रवादीत जायची धमकी दिली. तेव्हा कुठं हिंदुत्व होतं? उद्धव ठाकरे यांनी नुपूर शर्मा सारखी थिल्लर वक्तव्य केली नाही. ही त्यांची चूक आहे का? हिंदू धर्मातील कोणता ग्रंथ आहे? ज्यांच्यात हिंदू होण्यासाठी इतर धर्माचा द्वेष केला पाहिजे ? मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध द्वेष केला पाहिजे ? हे हिंदू धर्मात कुठे आहे ? हे विश्वाची माझे घर आहे ही संकल्पना घेऊन उद्धव ठाकरे निघाले आहेत. हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला. हिंदू कुटुंब संकटात असताना पळून जात नाही, अशा त्या पुढे म्हणाल्या.
