दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील बावडा गावचे युवा कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत असणारे संकेत विजय काटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने हर्षवर्धन पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
एकीकडे राज्यात सत्तांतर होऊन, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांची सत्ता गेली असताना, व राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाची पडझड होत असताना, दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संकेत काटकर यांनी पक्ष प्रवेश केल्याने इंदापूर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कामाची पद्धत आणि विचारसरणी आवडल्याने या पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी जवाबदारी देईल ती चोख पणे पार पाडणार आहे.असे या वेळी बोलताना संकेत काटकर यांनी सांगितले.
