दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नाशिक जिल्ह्यांतील लवहित गावचा भूमिपुत्र देशसेवा करीत शहीद नाशिक जिल्ह्यांतील लवहित गाव हे देशसेवा करणाऱ्या तरुणांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आहे. या गावांमध्ये कैलासवासी संतोष विश्वनाथ गायकवाड यांना वयाच्या ४२ वर्षी तोफखाना केंद्र २८५ मिडियम रेजिमेंटचे जवान लान्स नायक संतोष विश्वनाथ गायकवाड हे सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या पोस्टवर लंका येथे सेवा कर्तव्य बजावताना बर्फाळ प्रदेशांमध्ये हिम स्खलनमुळे त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ऐंन दिवाळीच्या तोंडावर गावातील सुपुत्र शहीद झाल्यांचे वृत्त समजतात लवहित गावासह पंचकोशीत शोककळा पसरली. अत्यंत प्रेमळ स्वभाव व नम्र असलेला संतोष हा मुलगा आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन देशसेवा करण्यासाठी सन २००० मध्ये सिक्कीम आठवली मीडियम इंडियन आर्मी रेजिमेंट मध्ये भरती झाले होते. सर्वत्र दिवाळी सणाचा आनंद पसरलेला असताना नाशिक जिल्ह्यांतील लवहित गावातील गायकवाड कुटुंबीयांवर ऐंन दिवाळीत मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. जवान शहीद संतोष गायकवाड यांच्या पश्चांत आई,वडील,पत्नी तीन मुले भाऊ दोन बहिणी असा त्याचा परिवार होता. शहीद जवान संतोष गायकवाड यांचे बंधू देशसेवेत कार्यरत तर दोन बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत.नाशिक जिल्ह्यांतील सुपुत्राला वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती सातारा पत्रकार श्री पुरी गोसावी यांना समजतात त्यांनी नाशिक जिल्ह्यांतील लवहित गावचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेत यावेळी पुरीगोसावीं यांनी शोक व्यक्त केला. यावेळी लवहित ग्रामस्थांचा पंचकोशींतील तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी/कर्मचारी तसेच तहसीलदार प्रांत आदीं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी संतोष गायकवाड यांना शासकीय तमामांत मानवंदना देवुन दिला अखेरचा निरोप.
