दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी -राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर :- दि.03.12.22 परमेश्वराने दिव्यांग व्यक्तीवर अगोदरच अन्याय केलेला असतो. त्यात समाजात परत त्यांची काही लोकांच्याकडून अवहेलना केली जाते. त्यामुळे समाजाने दिव्यांग व्यक्तीचा सर्वच स्तरावर आदर आणि सन्मान करावा असे आग्रही प्रतिपादन न्यायाधीश आशिष साबळे यांनी केले. दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने श्री संतज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालय आणि श्री पांडुरंग मूकबधिर विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित दिव्यांग सन्मान सोहळा व कायदा विषयक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विकास तपसाळे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश शिवराज तोंडाचीरे एडवोकेट वीरेश उप्पे, एडवोकेट महाजन कांबळे, एडवोकेट आर आर वाघमारे, सहशिक्षक राम तत्तापुरे, मुख्याध्यापक दत्तात्रय बिराजदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सहशिक्षक राम तत्तापुरे, एडवोकेट आर आर वाघमारे यांचे दिव्यांगाच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मार्गदर्शनपर अशा स्वरूपाची भाषणे झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून न्याय गीताने करण्यात आला. यावेळी दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा व आदर्श दिव्यांग जोडप्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्याच बरोबर
पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात पालकांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्ताञय बिराजदार यांनी सूत्रसंचलन अश्रूदादा सुपे यांनी आभार बालाजी वाडीकर यांनी मानले. या दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दुपारच्या सत्रात सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक रामदास बिरादार, ज्ञानोबा चिमले, संतोष हालणे, सीमा मुळे, काशिनाथ आगलावे, शिरीष पाटील,संजू पाटील, योगिता पवार, चांगुना कांबळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
