दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल- माणिक सुर्यवंशी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत त्या अनुषंगाने बिलोली तालुका युवा सेनेचे कार्यकिरणी जाहीर करण्यात आली युवा सेनेचे प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांनी पक्षबळकट करण्यासाठी 2 डिसेंबर रोजी मुंबई येथे कार्यकारिणी जाहीर केले असून नांदेड जिल्ह्यातील व बिलोली तालुका स्तरावर तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आटकळीचे युवा नेतृत्व भास्कर भालेराव यांची रामतीर्थ सर्कल युवा विभाग अधिकारीपदी सर्वानुमते निवड करण्यात आले बिलोली तालुक्यातील रामतीर्थ सर्कल ग्रामीण भागात सर्वच स्तरावर त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
