दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पीकविमा हप्ता भरला नैसर्गिक आपत्तीमुळे व अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाले. त्या पिकाची नुकसान झाल्याची तक्रार पीकविमा कंपनीकडे केली तरी पीकविमा कंपनीचा प्रतिनिधी पीकाचे नुकसान पाहण्यास थिरकला नसून फोन केल्यास प्रोसेस चालू आहे सांगतात शेतकरी चिंतेत.भरलेला पैसा येतो जातो.झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची विमाकंपनीची जबाबदारी असून कंपनीने तक्रार करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची दखल घेऊन रक्कम खात्यात वर्ग करावी अशी हाक शेतकरी वर्गातून येत आहे.
