दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:मुखेड तालुका युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा लिंगायत समाजाचे नेते संग्राम मळगे आप्पा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या राजकारणातील
संग्राम मळगे आप्पा है काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सक्रिय कार्यकर्ते महणून ओळखले जात होते.
संग्राम मळगे आप्पा यांनी भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
विधान भवन नागपूर येथे मुखेड विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे नेते संग्राम आप्पा मळगे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील बोडके व काँग्रेसचे तालुका सोशल मीडिया प्रमुख गुरुनाथ पाटील पाळेकर या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर तुषार राठोड, व्यंकट जाधव तालुका सरचिटणीस भाजपा, हेमंत खंकरे तालुका सरचिटणीस भाजपा, विजयकुमार स्वामी तालुका उपाध्यक्ष भाजपा, नागेश गोपनर तालुका उपाध्यक्ष भाजपा, कपिल बनबरे उपाध्यक्ष तालुका भाजपा युवा मोर्चा, सय्यद जलालुद्दीन तालुका उपाध्यक्ष मायनॉरिटी मोर्चा भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ते देविदास राठोड इत्यादी प्रमुखांच्या उपस्थितीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला.
