दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – लोहा तालुक्यातील शिवणी जा येथे भव्य दिव्य अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. काल्याची किर्तनसेवा श्री ह भ प गुरूवर्य माऊली महाराज मुडेकर यांची संपन्न झाली.
दरवर्षी प्रमाणे चालत असलेला अखंड हरीनाम सप्ताह शिवणी जा येथे सप्ताह संयोजन समिती व गावकरी मंडळी शिवणी जामगाच्या वतीने आठ दिवसांत श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण हरीपाठ काकडा व राञी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींचे किर्तन आयोजित केले होते शेवटच्या दिवशीची काल्याची किर्तनसेवा श्री ह भ प गुरूवर्य माऊली महाराज मुडेकर यांची संपन्न झाली यावेळी किर्तन सेवेत महाराजांनी श्रोते मंडळी व युवा वर्गाला व्यसनापासून दूर व्हावे गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी कपाळावर गोपिचंद टिळा लावावा व लहान मुलांना योग्य संस्कार हरीपाठ काकडा ज्ञानेश्वरी, गाथा , भागवगीता वाचण्यासाठी उत्तेजीत करावे सर्वांनी आपले आचरण सुध्दा ठेवावे भगवान परमात्मा आयुष्यात कशाचीही कमी पडु देणार नाही असे यावेळी श्रोते मंडळीना आपल्या किर्तनातुन प्रबोधन केले यावेळी परीसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या किर्तनात प्रसंगी नांदेड दक्षिणचे आ मोहन आण्णा हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावकरी मंडळी शिवणी जामगाच्या वतीने सप्ताहात आठ दिवस अन्नदान व महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.
