दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी पुरीगोसावी
जिल्हा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार साहेब यांची मसूर पोलीस ठाण्यात माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरुन बदली करण्यांत आली तर त्यांच्या रिक्त जागी अभिजीत यादव आता सातारा शहर वाहतूक शाखेचे नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारला. जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी अडीच वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये सातारच्या ऐतिहासिक शहरांमध्ये वाहतूक नियंत्रणावर अगदी बारकाईने आपल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी चांगलेच नियंत्रण ठेवले होते. तसेच त्यांना शहरवासीयांनी सुधा चांगले सहकार्य केले. त्यामुळे विठ्ठल शेलार साहेब यांचा जिल्हा वाहतूक शाखेतील हा कार्यकाळ अगदी कर्तव्यदक्ष आणि उत्कृंष्टच राहिला. त्यांच्या बदलीचे शहरामध्ये वृत्त समजताच विविध मान्यवर मंडळींनी त्यांची पोलिस ठाण्यात सदिच्छा भेट घेत त्यांच्या कामाबद्दल कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी साहेब तुम्ही सातारकरांना विसरून जाऊ नका, काही मान्यवर मंडळी साहेबांना म्हणाले यावेळी साहेब म्हणाले मी सातार शहरवासीयांना कधीच विसरु शकत नाही. कारण त्यांच्या सहकार्यामुळे मला शहरांमध्ये चांगले काम करता आले. यावेळी शनिवारी सायंकाळी जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार साहेब यांचा जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहांत भावनिक निरोप देत मोठ्या उत्साहांत निरोप समारंभ संपन्न करण्यांत आला. यावेळी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांचे स्वागत करीत सातारा शहर वाहतूक विभागांचा पदभार सोपवला. आतापर्यंत सातारच्या शहर वाहतूक विभागाला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळत गेले यामध्ये श्रीगणेश कानगुडे कुमारघाडगे-पाटील युवराज हांडे के.एम पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी शहर वाहतुकीवर चांगलेच नियंत्रण ठेवले होते.
