दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:मौजे सांगवी( क) येथे पहीला (१) सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रथराज परमरहस्य पारायण सोहळा आयोजित निमित्त प्रसादावरील काल किर्तनाची सेवा पार पाडले. व शिवनाम सप्ताहाची सांगता झाला.
सदगुरु ष.प.ब्र.१०८ श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर यांच्या हस्ते ता.१ एप्रिल रोजी शनिवारी सकाळी ८ वाजता सप्ताहस्थळी शिवदिक्षा कार्यक्रम सोहळा पार पाडले. या सप्ताहात सदगुरु ह.भ.प.श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर
सदगुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर,सदगुरु श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज हाणेगावकर,सदगुरु श्री डाॅ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे प्रवचन व आर्शिवाद लाभले.
दरम्याण शिवकिर्तनकार शि.भ.प.कावेरीताई मुदखेडे,शि.भ.प.भाग्यश्रीताई पाटील,शि.भ.प.किर्तीताई स्वामी,शि.भ.प.तुकाराम महाराज साखरे,शि.भ.प.राजेश्वर महाराज लाळीकर,शि.भ.प.अमोल महाराज लांडगे बनवसकर,शि.भ.प.विश्वनाथ महाराज पेनूरकर यांचे किर्तन झाले. ता.१ एप्रिल रोजी टाळआरतीचे किर्तन शि.भ.प.किशोरीताई ताकबीडकर यांचे तर, ता.२ एप्रिल रोजी रविवारी महाप्रसादाचा किर्तन शि.भ.प.शिवानंद महाराज दापशेडकर यांचे पार पाडले.तदनंतर महाप्रसादचा कार्यक्रम पार पाडला.यावेळी अखंड शिवनाम सप्ताहात सुप्रसिध्द गायक व वादकांची उपस्थिती लाभणार होती. या कार्यक्रमाचे पंचक्रोशीतील सर्व सदभक्त भाविक भक्तांनी उपस्थिती होती.
