दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
कळंब बाजार समितीचे प्रशासक व सचिव यांनी संगणमत करून आर्थिक घोटाळा केला आहे, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री व कृषी पणन मंडळाकडे व्यापारी संतोष धस यांनी केली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,कळंब बाजार समितीचे प्रशासक बी. एस. फासे व सचिव दत्तात्रय वाघ यांनी संगममताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे केले आहेत. व्यापाऱ्यावर दडपशाही करून मनमानेल तसे भूखंड भाड्याची वसुली करून ,आर्थिक, मानसिक त्रास दिला आहे. मार्केट यार्ड मध्ये मूलभूत सुविधांची गरज असतानाही सुविधा उपलब्ध न करता , बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठे लोखंडी गेट व बोर्ड बसवून आर्थिक घोटाळा केला आहे. तसेच भूखंड भाड्याच्या पावत्यावर वर्ष नमूद केलेले नाही.हे विचारल्यास सचिव वाघ हे प्लॉट रद्द करण्याची धमकी व्यापाऱ्याना देतात. मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासक व सचिवाची विशेष समिती नेमून चौकशी करावी .अशी मागणी व्यापारी संतोष धस यांनी मुख्यमंत्री ,कृषी पणन मंडळ यांच्याकडे केली आहे.
