दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): मानवाधिकार सहायता संघाच्या(एम.एस.एस) आष्टी तालुका अध्यक्षपदी आष्टी शहरातील तरुण नेतृत्व अनिल इंगळे तर सचिवपदी मंगलाताई भोंगे यांची निवड करण्यात आली आहे समाजसेवेतील प्रतिष्ठा,निष्ठा आणि कर्तव्यनिष्ठता विचारात घेवून मानवाधिकार संघाच्या कार्याला समाजाच्या ग्रामीण तथा शहरी स्तरावर पोहोचवण्यास सजग असण्यासह समाजातील अनिष्ट रूढी परंपरांशी आणि मानवधिकाऱ्याच्या हननविरुद्ध लढा देण्यासाठी त्याचप्रमाणे संघाच्या मजबुती करनासाठी इमानदारी आणि निष्ठेने कार्य करण्यासाठी अनिल इंगळे तर सचिवपदी मंगलाताई भोंगे यांची निवड करण्यात आली आहे असे नियुक्तीपत्र संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मानव अधिकार सहायता संघाचे डॉ. सोनू सिंह, राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र प्रदेश कल्पेश व्यास, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रीय प्रभारी रवी धारणे, प्रदेश प्रभारी महाराष्ट्र राष्ट्रीय महिला संघटन मंत्री हेमलता धारणे विभागीय कार्यालय नागपूर यांच्या सहिनीशी नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे त्यामुळे अनिल इंगळे व मंगलाताई भोंगे यांचेवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
